Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

लोककलावंतांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा

पहिल्या समरसता लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची मागणी

marathinews24.com

पुणे –  समाजात समरसता वृद्धिंगत करण्याच्या कामात लोककलावंतांचा सहभाग वाढावा या उद्देशाने समरसता लोककला संमेलन आयोजित करण्याचा उपक्रम उल्लेखनीय असला तरी प्रत्यक्षात खुद्द लोक कलावंत अद्यापही उपेक्षितांचे जगणे जगत असून त्यांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी पहिल्या समरसता लोककला संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री रघुवीर खेडेकर यांनी केली.

पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ लसीकरण – सविस्तर बातमी

लोककलावंतांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचाव्या, लोककलावंतांमध्ये विचारांचे आदान प्रदान व्हावे व विविध लोककलांचा रसिकांना परिचय व्हावा, या दृष्टीने राज्याचा सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि समरसता साहित्य परिषद यांच्या वतीने या वर्षापासून समरसता लोककला संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या पहिल्या संमेलनात ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी नर्तिका मधू कांबीकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्या अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या भगिनी रत्ना कांबीकर यांनी स्वीकारला.

याप्रसंगी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आलेगांवकर,  लोककलावंत नंदेश उमप,  पद्मश्री वितहाबाई नारायनगावकर यांच्या कन्या  मंगला बनसोडे, लीला गांधी, जयमाला इनामदार, सुरेखा पुणेकर, छाया आणि माया खुतेगावकर, राधा खुडे,  बिग बॉस फेम अहिराणी गायक सचिन कुमावत, नृत्यांगना वैशाली जाधव, रेशमा मुसळे, अनिल मोरे, सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या  जान्हवी जानकर, वारकरी परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ गराडकर,  भाजप शहराध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष धीरज घाटे, संमेलनाचे आयोजक धनंजय खुडे, निलेश गद्रे, डॉ प्रसन्न पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

समाजात एकोपा वाढावा, विचारांची देवाण-घेवाण व्हावी, म्हणजेच सामाजिक समरसता! लोक कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून शतकानुशतके प्रबोधनाचे, सांस्कृतिक आदान प्रदानाचे आणि सलोखा निर्माण करण्याचे कार्य परंपरेने करीत आहेत. मात्र, लोक कलावंतांचे स्वतःचे जगणे अजूनही आव्हानात्मक स्वरूपाचे आहे, याकडे खेडेकर यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.

शासनाच्या लोककलावंतांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोक कलावंत निश्चितपणे पुढे येतील. मात्र, लोककलावंतांकडे आजही गावकुसाबाहेर असल्याप्रमाणे बघितले जात आहे. आपली कला सादर करण्यासाठी गावोगाव फिरणाऱ्या कलावंतांना प्रस्थापितांकडून अन्याय सहन करावा लागतो. स्थानिक पोलिस आणि प्रशासन देखील कलावंतांच्या तक्रारींची दखल न घेता प्रस्थापितांची पाठराखण करतात. हे सर्व आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या कानावर घालायचे होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीने आमची निराशा झाली, असे परखड मतही खेडेकर यांनी व्यक्त केले.

समाजात साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून समरसता निर्माण करण्याच्या दृष्टीने समरसचा साहित्य परिषद 25 वर्षापासून कार्यरत आहे. यावर्षीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या समरसता लोककला संमेलनाचे स्वरूप केवळ उत्सवी नाही. लोककलावंतांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने दुवा निर्माण करणे आणि समाज प्रबोधनाच्या प्रक्रियेत लोककलावंतांचा सहभाग वाढविणे, ही या आयोजनातील प्रमुख उद्दिष्ट आहेत. लोकं कलावंतांचे हित साधण्यासाठी तसेच लोककलांचा उपयोग समाजासाठी करण्याच्या उद्देशाने संघटन उभे करण्याचे काम परीक्षा त्यांनी हाती घेतले आहे. हे संघटन विद्रोहासाठी नाही तर समाजाला आणि देशाला पुढे नेण्यासाठी आहे, असे समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ प्रसन्न पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

अहिराणी भाषा आणि खानदेशी लोककला यांच्या बद्दलची निष्ठा आणि त्याच्या विकासासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न यामुळेच आज शिखरा एवढ्या माणसांबरोबर बसण्याची संधी आपल्याला मिळाली, असे उद्गार बिग बॉस फेम अहिराणी लोककलावंत सचिन कुमावत यांनी काढले.

महाराष्ट्राच्या विविध विभागांमध्ये लोककलांचे मोठ्या प्रमाणावर वैविध्य दिसून येते. या परंपरा टिकवून ठेवणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम केले जातात. हे संमेलन म्हणजे त्याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे संमेलनाचे स्वागतताध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, कार्यक्रमाचे संयोजक आणि आघाडीचे लोक कलावंत धनंजय खुडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

उद्घाटनाच्या सत्राची सुरुवात स्वरानुभव भजनी मंडळाच्या गणेश स्तवनाने झाली. फोक प्रबोधनच्या युवा वादकांनी सादर केलेल्या ढोल, ताशा, मृदुंग, डीमडीं, ढोलकी, डफ, पायपेटी आणि बासरी या पारंपारिक वाद्यांच्या जोशपूर्ण वादनाने संमेलना चैतन्य निर्माण केले. शांती ब्रह्म गुरुकुलच्या बाद वादकांनी पारंपारिक वारकरी पद्धतीने मृदंगवादन केले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी महापालिका भवन ते बालगंधर्व रंगमंदिर अशी कलावंत दिंडी काढण्यात आली, तसेच कला दालनात विविध लॉककला वाद्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

धनंजय खुडे यांनी प्रास्ताविक केले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले तर संमेलनाचे आयोजक निलेश गद्रे यांनी आभार मानले.

…तर प्रसंगी पद्मश्री परत करू

या लोककला संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अन्य मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, अचानक उद्भवलेल्या अन्य कार्यक्रमामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. याबद्दल खेडेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लोककलावंतांच्या पदरी आजही उपेक्षाच पडत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री पाच वर्ष त्यांच्या पदावर राहणार आहेत. त्यांना नेहमीच दिवस-रात्र काम असणार आहे. मात्र, डोकं कलावंतांकडून अपेक्षा व्यक्त करताना त्यांची कैफियत ऐकून घेणे हे देखील त्यांचे कामच आहे. यापुढील एक महिन्याच्या कालावधी पुन्हा एकदा अशाच संमेलनाचे आयोजन मुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या उपस्थित करण्यात आले नाही तर आपण आपला पद्मश्री पुरस्कारही परत करू, असा इशारा खेडेकर यांनी यावेळी दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×