Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

मनसेच्या आंदोलनानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यानी कंत्राटदाराला झापले

मनसेच्या आंदोलनानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यानी कंत्राटदाराला झापले

मोबाइलद्वारे संपर्क करुन काम पूर्ण करण्याच्या सूचना

marathinews24.com

पुणे – शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अपुर्‍या सुविधांसह अर्धवट बांधकामाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सोमवारी (दि. ३१) प्राचार्यांसह प्रशासनाची कानउघडणी केली होती. त्याचपार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ शिवाजीनगरमधील महाविद्यालयात धाव घेतली. प्राचार्यांकडे सुरू असलेल्या कामाबाबत माहिती घेतली. त्यानंतर कंत्राटदाराला मोबाइलद्वारे संवाद साधून झापले. काम संथ गतीने का सुरू आहे, काही अडचणी आहेत का, अशी विचारणा केली.

‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर – सविस्तर बातमी 

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील यांच्या कार्यालयात महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. यावेळी मनसेच्या आंदोलकांनी मोदींचा फोटो हटविला होता. त्यासोबत महाविद्यालयातंर्गत सुरू असलेल्या विविध कामासंदर्भात विचारणा केली. जर आठ दिवसांच्या आतमध्ये काम झाले नाही तर, आमचे कार्यकर्ते पुन्हा महाविद्यालयात येतील, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये कार्यकर्ते पदाधिकार्‍यांनी त्याच ठिकाणी पुन्हा फोटो लावण्याचा चंग बांधला. त्यानंतर मोदींचा फोटो पुन्हा कार्यालयात आहे, त्याच ठिकाणी लावण्यात आला. राजशिष्टाचार प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उच्च शिक्षण मंत्र्याकडून कंत्राटदाराची कानउघडणी

महाविद्यालयातील अपुर्‍या कामांच्या पार्श्वभूमीवर मनसेने केलेल्या आंदोलनामुळे वातावरण तापले होते. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगेचच महाविद्यालयात येउन प्राचार्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या मोबाईलवर संबंधित कंत्राटदाराला संपर्क साधला. काम पुर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावा, तांत्रिक अडचणी असल्यास पाठपुरावा करण्यासाठी कार्यालयाशी संपर्क करा, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी ठेकेदाराला केल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×