Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

शेततळ्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

शिरुरमधील इनामगावात भागातील घटना

marathinews24.com

पुणे – शेततळ्यात बुडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरुरमधील इनामगावात मंगळवारी घडली. सार्थक आकाश आमले (वय ३) असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील आकाश नामदेव आमले (वय २७ सध्या रा. नांदेमळा, इनामगाव, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. मोहापूर, ता. किनवट, जि. नांदेड) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

‘मोक्का’ कारवाईनंतर पोलिसांना गुंगारा देणारा अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आमले आणि त्यांची पत्नी निकिता हे मजुरी करतात. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील मोहापूर गावचे रहिवासी आहेत. त्यांना सार्थक नावाचा तीन वर्षांचा मुलगा आहे. मंगळवारी (३० जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास आमले दाम्पत्यासह दहा ते बारा मजूर संजय सातव यांच्या केळीच्या बागेत काम करत होते. कामावर त्यांनी तीन वर्षांचा मुलगा सार्थक याला आणले होते. सातव यांच्या केळीच्या बागेत शेततळे आहे. आमले दाम्पत्याने मुलगा सार्थक याला मोबाइल संच खेळण्यासाठी दिला होता. सार्थक शेततळ्यापासून काही अंतरावर होता. काही वेळानंतर मोबाइलवरल लावलेल्या गाण्यांचा आवाज बंद झाल्याने आकाश आणि त्यांची पत्नी निकिता यांनी सार्थकला पाहिले. तेव्हा सार्थक तेथे नव्हता. तो बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय सातव आणि ग्रामस्थांना याबाबतची माहिती दिली.

सार्थकचा शोध घेण्यात आला. तेव्हा सार्थक हा शेततळ्यात बुडाल्याचे लत्रात आले. गावातील तरुणांनी शेततळ्यात बुडालेल्या सार्थकला बाहेर काढले. त्याला तातडीने मांडवगण फराटा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सार्थकचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार खबाले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×