Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

हडपसरमध्ये महिलांचे दागिने हिसकावणार्‍या दोघांना अटक, ५ गुन्हे उघडकीस

हडपसर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना। हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणून, ७ लाख ४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये साडेचार लाखांचे दागिने, दुचाकीचा समावेश आहे. अनिकेत विजय चव्हाण (वय २४ रा.मुळ रा. खुणेश्वर ता.मोहोळ जि.सोलापुर सध्या रा. कामधेनु इस्टेट हडपसर ) आणि ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण (वय २३ रा. खुणेश्वर ता. मोहोळ जि.सोलापुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात गुरुवार पेठेत सोसायटीला आग – सविस्तर बातमी

शहरातील हडपसरसह आसपासच्या परिसरात मागील महिन्यापासून चैनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. विशेषतः संध्याकाळी महिलांना लक्ष करून गर्दिच्या ठिकाणी सोनसाखळी हिसकावून नेली जाण्याचे प्रमाण जास्त होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात अधिकार्‍यांची बैठक घेत् गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १८ ऑगस्टला तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, महावीर लोंढे, माधव हिरवे हे गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार महावीर लोंढे यांना चोरट्यांची माहिती मिळाली.

पोलिसांच्या तपास पथकाने दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. चौकशीत त्यांनी हडपसर परिसरात महिलांच्या सोनसाखळी हिसकावल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ५ चैन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अटक आरोपी ज्ञानेश्वर चव्हाण याच्यावर यापुर्वी हडपसर, वानवडी, सिंहगड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ, समर्थ परिसरात सोनसाखळी हिसकावण्याचे १६ गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त, रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे यांनी आहे.

गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांनी संध्याकाळी साडेसात ते साउनउच्या सुमारास दागिने हिसकावले होते. शेवाळवाडी, महादेव मंदिर, गाडीतळ, हडपसर, मांजरी परिसरात दागिन्यांची चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×