पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

२० मोबाईल जप्त, पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – रेल्वे प्रवाशाच्या मोबाईलसह नागरिकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पुणे लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपींकडून तब्बल २० मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत १ लाख ९० हजार रुपये आहे.बुद्धराज मोरपाल बागडी ( वय ३२) आणि अमरलाल हंसराज बागडी (वय २२ दोघेही रा. बारा राजस्थान) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. रुतुराज काटकर यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पुणे जिल्ह्यात १८ सप्टेंबरपर्यत प्रतिबंधात्मक आदेश लागू – सविस्तर बातमी

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काटकर आणि त्यांचे मित्र संजय दिंडोड हे ३० ऑगस्टला रात्री साडे आठच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवर दानापूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात चढत होते. त्यावेळी चोरट्याने त्यांचाकडील १५ हजारांचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मोबाईल चोरणारे मंगळवार पेठेत झोपडीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवार पेठ परिसरात सापळा रचला. त्यावेळी दोन संशयित पोलिसांना पाहून पळू लागले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

दोन्ही आरोपींनी मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या झोपडीची झडती घेतल्यावर २० मोबाईल फोन पोलिसांना मिळुन आले. दरम्यान, मोबाईल चोरी केल्यानंतर दोघेही चोरटे जुन्या बाजारातून मोबाईल विकत घेत होते. त्यानंतर ते मोबाईल कमी किमतीत विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, सुनिल कदम, अनिल दांगट, निलेश बिडकर, सिध्दार्थ वाघमारे, नेमाजी केंद्रे, मारटकर, छाया चव्हाण, आरपीएफ निरीक्षक यादव, उपनिरीक्षक लाड, आरक्षक युवराज गायकवाड, विशाल माने, रसुल सय्यद यांनी केली.

रेल्वे डब्यात प्रवेश करत असलेल्या प्रवाशाकडील मोबाईल चोरणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अधिक चौकशीत त्यांच्याकडून २० मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांनी संबंधित प्रकरणात चौकशी सुरू आहे. रोहिदास पवार, अपर पोलीस अधीक्षक, पुणे लोहमार्ग

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×