Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

मुंढवा चौकात दुचाकीस्वार चोरट्यांचा राडा, तरुणाला लुटले

मुंढवा चौकात दुचाकीस्वार चोरट्यांचा राडा, तरुणाला लुटले

दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोटारीतून प्रवास करीत असलेल्या कुटूंबियाचा पाठलाग करून त्यांना दुचाकी आडवी उभी करून लुटमार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २९ जूनला रात्री अकराच्या सुमारास मुंढवा चौकाजवळ घडली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय तरूणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतून महागडी माेटार चोरणारा अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून, २९ जूनला रात्री अकराच्या सुमारास मोटारीतून प्रवास करीत होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी मुंढवा चौकात त्यांची मोटार अडविली. तक्रारदाराला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडाओरड केल्यामुळे दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. दरम्यान, वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या लुटमारीच्या प्रयत्नामुळे प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पिंगुवाले तपास करीत आहेत.

भांडणाच्या रागातून तरूणावर वार, दोघे अटकेत

जुन्या भांडणाच्या रागातून तरूणावर शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघा हल्लेखोरांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २९ जूनला रात्री दहाच्या सुमारास पेरणे फाटा परिसरातील अविश्री डेअरी फार्मजवळ घडली आहे. प्रदीप चंद्रकांत माने (वय ३० रा. वढू खुर्द, तापकीर वस्ती) धु्रव रवी शर्मा (वय २३ रा. पेरणे, हवेली ) यांना अटक केली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात तरूणाने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणाच्या भावाची आणि आरोपी माने, शर्माचे भांडण झाले होते. त्याच रागातून दोघांनी २९ जूनला रात्री दहाच्या सुमारास तक्रारदाराच्या भावाला गाठले. त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात, मनगटावर, पायावर, पाठीवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवीकिरण कदम तपास करीत आहेत.

लुटमार करणार्‍या दोघांना अटक

रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाला अडवून त्याच्या खिशातील साडेचार हजारांची रोकड चोरणार्‍या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २८ जूनला संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील ज्योती चौकात घडली होती. फरान वसिम शेख (वय २१, रा. कोंढवा) फरमान अस्लम मलीक (वय १९ रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खोपडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×