बाणेर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना बाणेर परिसरात घडली.
याबाबत एका व्यावसायिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे तक्रार दिल्याने डोक्यात दगड घातला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हे कुटुंबियांसह बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील व्हेलेन्सिया सोसायटीत राहायला आहेत. १४ जून रोजी तक्रारदार व्यावसायिक सदनिका बंद करुन बाहेर गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, चांदीचे नाणे असा पाच लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना १५ जून रोजी सकाळी उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करत आहेत.























