Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २४ लाखांची फसवणूक

बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

पर्वती पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – महसूल खाते, सार्वजानिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सूर्यकांत विठ्ठल सपकाळ (वय ४६, रा. तळेगाव दाभाडे) योगेश अदिकराव पाटील (वय ४२, रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४५ वर्षीय महिला पर्वती भागातील लक्ष्मीनगर वसाहतीत राहायला आहेत. आरोपींशी त्यांची डिसेंबर २०२३ मध्ये ओळख झाली होती. एका आरोपीने महसूल खात्यात अधिकारी असल्याचे महिलेला सांगितले होते. ‘मंत्रालयात ओळख असून, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याम विभाग, कृषी विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी लावून देतो’, असे आमिष आरोपीने महिलेला दाखविले होते. त्यानंतर दोघा आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी २४ लाख रुपये घेतले. महिलेला समाजकल्याण आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले बनावट नियुक्तीपत्र दिले. महिलेने चौकशी केल्यानंतर आराेपींनी बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×