औंध येथील रोहन निलय सोसायटीजवळील घटना
marathinews24.com
पुणे – जुन्या भांडणाच्या कारणावरून औंध येथील रोहन निलय सोसायटीजवळ चार जणांनी मिळून एका तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुबारक तंजीमखान (वय २४ वर्षे, रा. बोपोडी, पुणे), मुस्तकीन युसूफखान (वय २० वर्षे, रा. दापोडी, पुणे), मरान युसूफखान (वय २५ वर्षे, रा. दापोडी, पुणे) व आमीर युसूफखान (वय २२ वर्षे, रा. दापोडी, पुणे) यांच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानसिक छळाला कंटाळून ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या – सविस्तर बातमी
इसराईल जावेदखान (वय २९ वर्षे, रा. फ्लॅट नंबर १०, जैनटाऊन शिप सोसायटी, चिंतामणीनगर, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २५ जून रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी हे रोहन निलय सोसायटीजवळ असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी मुबारक याने आपल्याजवळील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या मानेवर डाव्या बाजूला, डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ व नाकावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादीला पकडून हाताने बेदम मारहाण केली.
कर्वेनगर, खराडी येथे दरवाजा उघडा पाहून लॅपटॉपची चोरी
कर्वेनगर परिसरातील एका घराचा उघडा दरवाजा पाहून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने उशाशी ठेवलेले तीन लॅपटॉप लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजय राजेंद्र सपकाळे (वय २२ वर्षे, रा. कल्पतरू कॉलनी, गणपती मंदिराजवळ, घर नंबर ५०१, कर्वेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २० जून रोजी दुपारी साडेबारा वाजेपासून ते संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान फिर्यादी अजय सपकाळे यांच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. याचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने खोलीमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला. खोलीत उशाशेजारी ठेवलेले तीन लॅपटॉप चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान दुसऱ्या घटनेत खराडी परिसरातील एका पीजी हॉस्टेलच्या रूमचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नूरउद्दीन बशिरउद्दीन सय्यद (वय ३४ वर्षे, रा. कासा नाईन पीजी, रूम नंबर २०१, लेन नंबर ६, थिटेवस्ती, खराडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १९ जून रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान फिर्यादी नूरउद्दीन सय्यद यांच्या पीजी रूमचा दरवाजा उघडा होता. दरम्यान कोण्यातरी अज्ञात चोरट्याने रूममध्ये प्रवेश करून फिर्यादीचा ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला.























