परदेशी पर्यटकाला तंबाखू खाऊ घालण्याची धक्कादायक घटना, मुरुड जंजिरा किल्ल्यावर वाढती उदासीनता
Marathinews24.com
पुणे- सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या विदेशी पर्यटकाला छत्रपती संभाजीनगरमधील काही मुलांनी शिव्या शिकवण्याचा प्रकार नुकताच घडला होता. त्यानंतर आता याच पर्यटकाला मराठी तरुणाने तंबाखू खाऊ घातली आहे. ही बाब मुरुड जंजिरा गडावर फिरत असताना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यूझीलंडवरून हिंदुस्थानमध्ये दुर्ग भ्रमंतीसाठी आलेल्या युट्यूबरला सिंहगड किल्ल्यावर काही मुलांनी शिवीगाळ शिकवल्याची घटना घडली होती.
वाचनाची गोडी लावा, भविष्य घडवा, अजित पवार यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला – सविस्तर बातमी
न्यूझीलंडचा हा पर्यटक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संबंधित पर्यटकाला मराठी तरुणाने चक्क तंबाखू खायला शिकवल्याचे समोर आले आहे. ही घटना मुरूड जंजिरा किल्यावर घडली आहे. न्यूझीलंडचा युट्यूबर एलेन जंजिरा किल्ल्यावर पोहोचला होता. तेव्हा तो तरुणाला भेटला असता, त्यावेळी तरुण एलेन सोबत चालत होता. त्याला किल्ल्याची माहिती देत किल्ल्यावर फिरत असताना तरुण थांबला.त्याने तंबाखू मळल्याचे एलेनने बघितले. तेव्हा एलेनने हे काय आहे असे त्याला विचारले. हे काय खातोय असे विचारातच त्या तरुणाने ही तंबाखू आहे, माझ्याकडे पानमसाला सुद्धा आहे. त्याने पुड्या काढून दाखवल्यानंतर तरुणाने एलेनला तंबाखू खायची का, अशी विचारणा केली. त्यानंतर तंबाखू मळून देत कशी खायची हे देखील शिकवले आहे.