भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
Marathinews24.com
पुणे- रस विक्रीच्या दुकानासमोरून यामाहा कंपनीची दुचाकी चोरून नेणार्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. मिथुन सुगंध लोखंडे (वय २२ रा. महात्मा गांधी सोसायटी, सहकारनगर) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध भारती विदयापीठ पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पार्ट टाइम च्या आमिषाने १८ लाखांला गंडा – सविस्तर बातमी
कात्रज चौकातील उसाचा रस विक्रीच्या दुकानाच्या समोरील बाजूला तरुणाने दुचाकी पार्क केली होती. त्यावेळी १६ एप्रिलला चोरट्याने दुचाकीचे लॉक तोडून गाडी चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्यासह पथकाला दुचाकी चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथक आरोपीचा शोध घेत असताना, संबंधित गुन्हा सराईत मिथून लोखंडे याने केल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून लोखंडे याला ताब्यात घेत त्याच्याकडून दुचाकी जप्त केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार यांनी केली.