७ ते ८ किलोमीटर वाहनांच्या रांगा
Marathinews24.com
पुणे – शालेय महाविद्यालयीन सुट्टयासह नोकरदारांनी सलग तीन दिवस पर्यटनासाठी सुटी जोडून घेतल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईकर घराबाहेर पडले. त्यामुळे पर्यटन स्थळांवर जाण्यास निघाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट परिसरामध्ये साधारणतः ७ ते ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमंडली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी
गुड फ्रायडेच्या सुट्टीला जोडूनच शनिवार आणि रविवार आल्याने आहेत. सलग तीन दिवस सुट्ट्यांच्या निमित्त पर्यटन स्थळांवर जाण्याचा चंग बांधत मोठ्या प्रमाणात पर्यटक खाजगी वाहनांमधून घराबाहेर पडले आहेत. वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी याकरिता पहाटेच पर्यटक घराबाहेर पडले मात्र मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर त्यांना खंडाळा ते खोपोली दरम्यान वाहतूक कोंडी मध्ये अडकून पडावे लागले आहे. खंडाळा ते खोपोली दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.