विश्रामबाग पोलिसांची उत्तम कामगिरी
Marathinews24.com
पुणे – पिस्तूल बाळगणार्याला विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतुस असा ५० हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला. शनिवारवाडा परिसरात आरोपी कमरेला पिस्तूल लावून फिरत असताना त्याला अटक करण्यात आली आहे. आकाश दशरथ घोणे (वय ३० रा. भवानीपेठ, रामोशी गेट समोर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
अल्पवयीन मुलाने सुसाट चालवली रिक्षा १९ वर्षीय गाडीतील तरुणाचा गेला जीव – सविस्तर बातमी
कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यासाठी विश्रामबाग पोलिसांडून पेट्रोलिंग केले जात होते. त्यावेळी तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिस शेख यांना आरोपी आकाश घोणे हा फुटका बुरुज, शनिवार वाडा, शनिवार पेठ परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे पिस्तूल, काडतुस जप्त केले. ही कामगिरी उपायुक्त संदिपसिह गिल्ल, एसीपी साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, श्री अरुण घोडके, (गुन्हे), तसेच मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, सचिन अहिवळे, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, अनिस शेख, साताप्पा पाटील, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केलेली आहे.