गगणविहार चौक ते वायजंक्शन, गंगाधाम सोसायटी परिसरात नो पार्किंग
Marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती मार्केटयार्ड परिसरातील वाहतूक सुरळित करण्यासाठी गगणविहार चौक ते वायजंक्शन, तसेच गंगाधाम सोसायटीला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित केले आहेत. आदेशानुसार,गगणविहार चौक ते वाय जंक्शनपर्यंत आणि गंगाधाम सोसायटीच्या हद्दीत येणार्या रस्त्यांवर वाहने पार्क करता येणार नाहीत. अस्ताव्यस्थ पार्किंगमुळे वारंवार होणारी वाहतूककोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
पिस्तुलासह काडतुस बाळगणाऱ्या इसमास बेड्या – सविस्तर बातमी
मेघदूत हॉटेलपासून वर्धमानपुरी सोसायटीपर्यंत सुमारे ६०० मीटरचा भाग ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित केला आहे. या भागात ‘पी-१’ आणि ‘पी-२’ पार्किंगही लागू केले आहे. १ मे २०२५ पासून आदेश लागू करण्यात येणार असून, नागरिकांनी पार्किंग ठिकाणीच वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिस विभागाने केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालकांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, निर्णयाची पूर्वसूचना स्थानिक दुकानदारांसह नागरिकांना देण्यात येणार असून, नागरिकांनी मार्केटयार्ड परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.