पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा
marathinews24.com
पुणे – महिलांना शिक्षण व स्वावलंबनासाठी संधी उपलब्ध होत असताना, दुसरीकडे सासरच्या मंडळींकडून होणार्या छळाची प्रकरणे अद्यापही थांबलेली नाहीत. उच्चशिक्षीत ३० वर्षीय विवाहितेचा पतीसह सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांनी मिळून मानसिक व शारीरिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे. भारतात आणि ऑस्ट्रेलियात विवाहित महिलेचा छळ झाल्याबाबत नुकताच सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२५ दरम्यान घडला.
पिंपरी चिंचवड मध्ये दारूच्या नशेत बरळला आणि खुनाची उकल झाली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेसोबत आरोपी तरुणाचे लग्न झाले आहे. लग्नाचा सर्व खर्च फिर्यादीच्या घराच्यांनीच केला. पतीने व त्याच्या घरच्यांनी तिला कोणताही मान देता ती दुसर्या जातीची असल्याने तिला टोचून बालेले जात होते. नोकरी करून घरातील सर्व खर्च करून तिला कोणतीच चांगली वागणुक दिली जात नव्हती. पती तिला सतत हाताने मारहाण करून शिवीगाळ करत होता. तसेच महिला ऑस्ट्रेलिया येथे असताना आरोपी तिला सतत भारतात पाठविण्याच्या धमक्या देत होता. तिला घरातील कामे करण्यास लावुन तिचे पैसे वापरत होता. त्याने ऑस्ट्रेलिया येथील परमनंट रेसिडेन्स व्हिसासाठी तिच्या वडीलांकडून पैसे घेतले, मात्र परमनंट व्हिसासाठी अर्जच न करता तिची फसवणूक केली. तिचा मानसिक व शारिरीक छळ व आर्थिक छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.