छताच्या पंख्याला लटकवून घेतला गळफास
marathinews24.com
पुणे – केमिस्ट्री विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांने गळफास घेउन आत्महत्या केली आहे. अनित अभिषेक असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना १७ एप्रिलला नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयीन वसतीगृहात घडली आहे. पोलिसांनी त्याचे साहित्य, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट जप्त केले. दरम्यान, पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, त्याअनुषंगाने तपास केला जात असल्याची माहिती नांदेड सिटी पोलिसांनी दिली आहे.प्राथमिक निष्कर्षांवरून अनित अभिषेक हा नैराश्यात होता. त्याच्या निधनामुळे मित्रांसह नातलगांनी शोक व्यक्त केला आहे.
कात्रजमधील बंगल्यात घरफोडी; ९० हजारांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी
अनित अभिषेक हा महाविद्यालयात केमिस्ट्री विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. १७ एप्रिलला सकाळपासून संध्याकाळपार्यंत तो दिसून आला नाही. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मित्रांनी त्याला आवाज दिला असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. दरवाजा तोडल्यानंतर अनित अभिषेक छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला ताबडतोब संस्थेच्या रुग्णवाहिकेने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांसह पोलिसांना कळवण्यात आली.