मध्यवर्ती डेक्कन परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – दुचाकीवर चाललेल्या तरूणाचा पाठलाग करून एकाने त्याला मारहाण करीत खिशातील ७ हजारांची रोकड आणि मोबाइल असा ऐवज हिसकावून नेला आहे. ही घटना २१ जानेवारीला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तक्रारदार निखील दीपक चव्हाण (वय २४, रा. देशमुखवाडी, उर्जाशंकर सोसायटी)यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी साहिल गुलाब ठोबरे (रा. भुगाव) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रजमधील बंगल्यात घरफोडी; ९० हजारांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदर निखील आणि आरोपी साहिल एकमेकांच्या ओळखीचे आहेत. २१ जानेवारील दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निखील हा दुचाकीवर मित्र दत्तात्रय मालपोटे याच्यासोबत चालला होता. त्यावेळी आरोपी साहिलने त्यांचा पाठलाग करून राजामंत्री उद्यानाजवळ त्यांना गाठले. आरोपीने दोघानांही मारहाण करून निखीलच्या खिशातील रोकड, मोबाइल असा १९ हजारांचा ऐवज हिसकावून नेला. तक्रार अर्ज दाखल झाल्यामुळे उशिरा दिल्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.