सायबर चोरट्यांचा महिलेला गंडा
marathinews24.com
पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांसह महिलांना अक्षरशः वेठीस धरले असून, शेअर मार्वेâट, ट्रेडींगच्या गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईनरित्या लुट केली जात आहे. अशाच पद्धतीने ट्रेडींग स्टॉकच्या माध्यमातून नफा देउन विश्वास संपादित करीत सायबर चोरट्यांनी ४५ वर्षीय महिलेची १५ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ४ जानेवारी ते १६ फेबु्रवारी कालावधीत कोथरूडमधील भेलकेनगरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दुचाकीस्वार तरूणाला मारहाण करून लुटले…सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कुटूंबियासह कोथरूडमधील भेलकेनगरात राहायला आहे. ४ जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला. ट्रेडींग स्टॉकच्या माध्यमातून गुंतवणूकीवर नफा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार सायबर चोरट्यांनी सुरवातीला तक्रारदार महिलेला काही रक्कम ऑनलाईनरित्या पाठविली. त्यांचा विश्वास संपादित झाल्यानंतर महिलेने गुंतवणूक करण्यास सुरवात केली. अवघा सव्वा महिन्यात तब्बल १५ लाख रूपये महिलेने संबंधित सायबर चोरट्याच्या बँकखात्यात वर्ग केले. मात्र, त्यानंतर त्यांना परतावा किंवा नफा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक विक्रमिंसह कदम तपास करीत आहेत.