दुचाकी चोरटा गजाआड; ८ दुचाकी जप्त
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून ८ दुचाकी जप्त केल्या आहेत. अक्षय अंबादास ढावरे ( वय २८, रा. गणेश रावडे बिल्डींग, शिवनेरीनगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ढावरेने शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरल्या होत्या.
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सतर्कतेचे आदेश – सविस्तर बातमी
दुचाकी चोरट्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार निलेश देसाई, गोरखनाथ चिनके यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. पोलिसांना पाहताच ढावरे पळाला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. ढावरेची चौकशी करण्यात आली असता, चौकशीत ढावरेकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. तपासात त्याने कोंढवा परिसरातून ८ दुचाकी चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या. ही कामगिरी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार सतीश चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, विशाल मेमाणे, संतोष बनसुडे, अभिजित जाधव, लक्ष्मण होळकर, सूरज शुक्ला, सुजीत मदने, राहुल थोरात, विकास मरगळे यांनी केली.