दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकची कामगिरी
marathinews24.com
पुणे– घरफोडी करणाऱ्या चोरट्याला २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील ८ लाख ८६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकच्या पथकाने संबंधित चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले आहे. फिरोज मोहम्मद शेख ( वय ४३ रा. गल्ली नं १, अशरफनगर, कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोबाईल हिसकावला – सविस्तर बातमी
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, हवालदार पठाण, राठोड, पाटील खरात, तेलंगे, पठाण हे २४ एप्रिलला कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. घरफोडी गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करीत असताना पोलीस शिपाई खरात आणि पठाण यांनी सीसीटीव्ही फुटेजसह खबऱ्याने आरोपीची माहिती दिली. त्यानुसार पथकाने फिरोज मोहम्मद शेख ( वय ४३ ) याचा दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पथकाने आरोपी शेखच्या ताब्यातुन सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, घरफोडी चोरीसाठी लागणारे साहित्य असा ८ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व पोलीस अंमलदार जहांगिर पठाण, खरात, तेलंगे, इरफान पठाण, प्रदीप राठोड, गणेश ढगे, मनिषा पुकाळे, महेश पाटील यांनी केली आहे.