गुजरातच्या एजंटसह दुबईतील दाेघांवर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – इंडाे अर्फी मेटल्स काे एलएलसी कंपनीच्या माध्यमातून कच्चे मेटल्स पुरवण्याची बतावणी करीत गुजरातच्या एजंटसह दुबईतील दाेघांनी पुण्यातील व्यवसायिकाला ३ कोटी ७९ लाखाचा गंडा घातला आहे.त्यांना दुबईत डील करण्याकरिता बाेलवून घेत विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यवसायिकाकडून पैसे घेऊन कच्चा मालाचा पुरवठा न करता आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुधीर रघुनाथ बाराेट ( वय- ६२,रा. रविवार पेठ,पुणे) यांनी खडक पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व दोन काडतुसे जप्त – सविस्तर बातमी
इंडाे अर्फी मेटल्स काे एलएलसी सबपर्ला इंटरनॅशनल एलएलपीचे भागीदार संजय कुमार राघव ऊर्फ भुपेंद्र सिंग, प्रन्नवीर संजय ऊर्फ भुपेंद्र सिंग ( दाेघे रा. दुबई) व एजंट हार्दिक रमेशभाई पानसुरिया (रा. राजकाेट,गुजरात) यांच्यावर खडक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ यादरम्यान घडली आहे. संबंधित आरोपींनी संगनमत करुन तक्रारदाराच्या संस्थेकडून ३ कोटी ७९ लाख ७७ हजार रुपये इतकी रक्कम स्वीकारली. त्यांना कच्चा मालाचा पुरवठा केला नाही.
त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. इंडाे अर्फी मेटल्स काे एलएलसी तर्फे भुपेंद्र सिंग व त्यांचा मुलगा प्रन्वीर सिंग यांनी हेतुत कट कारस्थान करुन तक्रारदार संस्थेचा विश्वास संपादन करून फसवणूक केली. टु मार्क इंटरनॅशनल कंपनी तर्फे एजंट हार्दिक पानसुरिया यांनी आराेपीशी हातमिळवणी करुन व्यवहार करण्यासाठी मध्यस्थिती केली. त्यामुळे तिघाविराेधात पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे.