उड्डाणपुलाच्या दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार
Marathinews24.com
पुणे – कोंढव्यातील उड्डाणपुलाच्या दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. क्षितीज संदीप रसाळ (वय २२, रा. वेताळबाबा मंदिराजवळ, फुलवाला चौक, गुरुवार पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार रणजीत शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एनआयने घेतली जगदाळे कुटुंबीयांकडून दहशतवादी हल्ल्याची माहिती – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार क्षितीज हा कोंढवा ते लुल्लानगर दरम्यान असलेल्ला उड्डाणपुलावरुन २१ एप्रिल रोजी मध्यरात्री निघाला होता. त्यावेळी भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार क्षितीज उड्डाणपुलावरील दुभाजकावर आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक गायडे तपास करत आहेत.