सराईतांकडून पिस्टल, २ काडतुसे जप्त, दोन तडीपार गुंडाकडुन घातक शस्त्र ताब्यात
marathinews24.com
पुणे– शहरातील विविध भागात फिरणाऱ्या दोन सराईतांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून १ पिस्टल आणि दोन काडतुसे असा ३५ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यासोबतच दोन तडीपार गुंडही अटक करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. गणेश वाघमारे (रा. सर्वे नं १३० दांडेकर पूल) प्रथम उर्फ पॅडी सुरेश म्हस्के ( वय २० वर्षे रा. सर्वे नं. १३२, दांडेकर पुल) प्रथम उर्फ पॅडी सुरेश म्हस्के ( वय २०रा. सर्वे नं. १३२, दांडेकर पुल) रोशन अविनाश काकडे (वय २४ रा.तुकाईनगर सिंहगडरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सिंहगड रस्त्यावर घरफोडीची घटना, चोरट्यांनी १ लाखांचा माल लंपास केला – सविस्तर बातमी
विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्यासह रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एककडून पेट्रोलिंग केले जात होते. त्यावेळी हवालदार राजेंद्र लांडगे, अमर पवार व मयुर भोकरे यांना पर्वती पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात मोक्कयामधून सुटलेला आरोपी गणेश वाघमारे याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्याद्वारे तो दांडेकर पूल परिसरामध्ये दहशत पसरवून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणत होता. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली ससहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे यांनी आरोपी गणेशला राहत्या घरातून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्टल बाळगल्याची विचारणा केली, तेव्हा त्याने पिस्टल तेजस काशीनाथ शेलार याने विकत आणले आहे, असे सांगितले. ते आमच्या दोघांच्या सुरक्षतेतेसाठी दोघे त्याचा वापर करत असतो. आता ते पिस्टल तेजस शेलार याच्याकडे दिले आहे. त्यानुसार पथकाने तेजस काशिनाथ शेलार याला ताब्यात घेत, त्याच्या कमरेला खोचलेले १ सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्टल ,२ जिवंत काडतुसे मिळून आली. दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक केली आहे.
पुणे जिल्ह्यातून २ वर्षासाठी पर्वती पोलीस ठाणे व सिंहगडरोड पोलिसांच्या रेकॉर्डवर असणारे गुंड व तडीपार प्रथम उर्फ पॅडी सुरेश म्हस्के वय २० आणि रोशन अविनाश काकडे वय २४ हेही शस्त्रासह मिळून आले आहेत. त्यांच्यावर खंडणी विरोधी पथक एक व पोलीस स्टेशन कडील स्टाफ अशी संयुक्तीक कारवाई करुन भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२, ३७ (१) १३५, तसेच क्रिमीनल लॉ अमेनमेन्ट २०१३ कलम ७ प्रमाणे गुन्हे नोंद केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, अंमलदार राजेंद्र लांडगे, अमर पवार, मयुर भोकरे, दुर्योधन गुरव, सयाजी चव्हाण, गीताजंली जांभुळकर, प्रविण ढमाळ, रणजीत फडतरे, लहु सुर्यवंशी, विजय कांबळे यांनी केली आहे.