स्वारगेट पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी बजावली
Marathinews24.com
पुणे – देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणार्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी गावठी पिस्तूल, दोन काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. भक्तीसिंग दिपकसिंग दुधानी असे अटक केलेल्याचे नाव आहे. स्वारगेट पोलीस १४ फेब्रुवारीला डायसप्लॉट चौक गुलटेकडीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तपास पथकातील अंमलदार फिरोज शेख व सुजय पवार यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार भक्तीसिंग दुधानी हा डायसप्लॉट येथे कमरेला पिस्टल लावुन फिरत असल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे यांनी घटनास्थळी पाठलाग करुन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत कमरेला देशी बनावटीचे गावठी पिस्टल, दोन काडतुसे असा शस्त्रसाठा मिळून आला. आरोपीविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ०७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, मोराळे, शिंदे यांनी केली.