Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

ऑस्ट्रेलियासह पुण्यातही मानसिक व शारीरिक त्रासाचा सामना…

पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा

marathinews24.com

पुणे – महिलांना शिक्षण व स्वावलंबनासाठी संधी उपलब्ध होत असताना, दुसरीकडे सासरच्या मंडळींकडून होणार्‍या छळाची प्रकरणे अद्यापही थांबलेली नाहीत. उच्चशिक्षीत ३० वर्षीय विवाहितेचा पतीसह सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांनी मिळून मानसिक व शारीरिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे. भारतात आणि ऑस्ट्रेलियात विवाहित महिलेचा छळ झाल्याबाबत नुकताच सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२५ दरम्यान घडला.

पिंपरी चिंचवड मध्ये दारूच्या नशेत बरळला आणि खुनाची उकल झाली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेसोबत आरोपी तरुणाचे लग्न झाले आहे. लग्नाचा सर्व खर्च फिर्यादीच्या घराच्यांनीच केला. पतीने व त्याच्या घरच्यांनी तिला कोणताही मान देता ती दुसर्‍या जातीची असल्याने तिला टोचून बालेले जात होते. नोकरी करून घरातील सर्व खर्च करून तिला कोणतीच चांगली वागणुक दिली जात नव्हती. पती तिला सतत हाताने मारहाण करून शिवीगाळ करत होता. तसेच महिला ऑस्ट्रेलिया येथे असताना आरोपी तिला सतत भारतात पाठविण्याच्या धमक्या देत होता. तिला घरातील कामे करण्यास लावुन तिचे पैसे वापरत होता. त्याने ऑस्ट्रेलिया येथील परमनंट रेसिडेन्स व्हिसासाठी तिच्या वडीलांकडून पैसे घेतले, मात्र परमनंट व्हिसासाठी अर्जच न करता तिची फसवणूक केली. तिचा मानसिक व शारिरीक छळ व आर्थिक छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×