Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Jallosh Lokkalecha : बाल कलाकारांसाठी बुधवारी ‘जल्लोष लोककलेचा’

Jallosh Lokkalecha

बालरंगभूमी परिषदेकडून पुण्यातील राष्ट्रसेवा दल येथे आयोजन 

marathinews24.com

पुणे – बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ (Jallosh Lokkalecha) ही स्पर्धा बुधवारी (दि. ३०) पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राष्ट्रसेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक भवन येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी होणार असून, ते आपल्या कलागुणांचे प्रदर्शन तेथे करणार आहेत. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

राजकारणापलीकडचा काश्मीर जगासमोर; डॉ. वैदेही तामन यांच्या पाच ग्रंथांतून आध्यात्मिक वारशाचा वेध – सविस्तर बातमी 

ख्यातनाम लावणी सम्राज्ञी वर्षाताई संगमनेरकर, ज्येष्ठ वादक संतोष मोरे आणि तरुण पिढीतील गायिका अस्मिता चिंचाळकर हे यास्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. यानंतर लगेच प्रावीण्य मिळवलेल्या कलाकारांना पुणे जिल्हा शाखेतर्फे बक्षीस वाटप केलं जाणार आहे. (Jallosh Lokkalecha) ग्रामीण आणि शहर अशा दोन्ही विभागातील बाल कलाकार गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावणार आहेत. बुधवारची प्राथमिक फेरी पुणे येथे झाल्यानंतर २ आणि ३ ऑक्टोबर रोजी लातूर येथे या स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली असून, महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यातील कलाकार त्यामध्ये सादरीकरण करणार आहेत .

Jallosh Lokkalecha स्पर्धेच्या यशस्वितेसाठी बालरंगभूमी परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षा दीपाली शेळके, उपाध्यक्ष नारायण करपे, अरुण पटवर्धन, कोषाध्यक्ष शंकरराव घोरपडे, मुख्य सचिव प्रकाश खोत, तसेच विजयकुमार तांबे, संजय तांबे, नामदेव पडदुने ही सर्व कार्यकारी मंडळी प्रयत्न करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×