Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Pune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक

Pune MLC Election 2026

व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करा- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

marathinews24.com

पुणे – Pune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही आणि सर्व मतदारांना मतदानाचा हक्क नियमानुसार बजावता यावा, याकरिता विविध माध्यमांद्वारे व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

पुणे जिल्हा परिषद- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा शिक्षण उपक्रम पाच भाषांपर्यंत विस्तारला – सविस्तर बातमी 

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह समन्वय अधिकारी आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित पाचही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती तेली-उगले म्हणाल्या, मतदारांना मतदान करतांना वापरावयाचे पेन, पसंतीक्रमानुसार मतदान करण्याच्या पद्धतीबाबत माहिती देण्यात यावी. सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील समन्वय अधिकाऱ्यांशी संपर्कांत राहून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, याबाबत दक्षता घ्यावी. Pune MLC Election 2026 मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि मतदान व मतमोजणीसाठी आवश्यक साहित्याची पूर्तता होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेशी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

निवडणूक विषयक कामकाज करतांना आचारसंहिता विषयक तरतुदींबाबत मार्गदर्शक पुस्तिका तसेच जिल्हा निवडणूक प्रशासन तसेच भारत निवडणूक आयोगाच्या आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असेही विभागीय आयुक्त म्हणाल्या. (Pune MLC Election 2026) यावेळी नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रिया, मतदान व मतमोजणी प्रकिया, मतदार जनजागृती, मनुष्यबळ नियोजन, आचारसंहिता, तक्रारी, माध्यमे व खर्च नियंत्रण, मतदान पूर्वतयारी, वाहतूक आराखडा आदी विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×