Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Pune MLC Election 2026 : शिक्षक निवडणुकीसाठी सतेज पाटली ॲक्शन मोडवर

Pune MLC Election 2026 : शिक्षक निवडणुकीसाठी सतेज पाटली ॲक्शन मोडवर

पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग

marathinews24.com

पुणे – Pune MLC Election 2026 : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत मतदारसंघात जोरदार राजकीय जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे. आमदार पाटील यांनी आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार मोहन जोशी, कॉग्रेसचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या साथीने सोमवार पासून थेट विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. पुण्यातील विविध नामांकित शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांना भेटी देऊन या नेत्यांनी संस्था चालक व व्यवस्थापनाशी थेट संवाद साधला.

तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा – सविस्तर बातमी 

शिक्षक मतदारसंघात पुणे शहर आणि जिल्ह्यातील संस्थाचालकांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिल्याने आमदार सतेज पाटील आणि आमदार विश्वजीत कदम, यांनी पुण्यातील प्रमुख शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना वैयक्तिक भेटी देऊन काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठिशी राहण्याचे आवाहन केले. Pune MLC Election 2026 यावेळी जनता शिक्षण संस्थेचे जयप्रकाश जगताप, शाहू कॉलेजच्या प्रमिलाताई गायकवाड व कमलताई व्यवहारे, विलासराव देशमुख लॉ कॉलेजचे डॉ. व्ही. एस. अंकलेकोटे- पाटील, नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे माजी खासदार अशोकराव मोहोळ, शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे आण्णासो थोरात यांच्यासह इतर संस्थाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. संस्था प्रमुखांसोबतच या दोन्ही नेत्यांनी महाविद्यालयांमधील प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

शिक्षकांच्या न्याय्य हक्कांचे, पगाराचे आणि पेन्शनचे प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले. यावेळी माजी आमदार उल्हासदादा पवार, रफीक शेख, लहू निवंगुणे, प्रथमेश आबनावे, भाऊसाहेब आजबे, तौफिक मुल्लाण्णी यांच्यासह कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अभय छाजेड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा पुणे शिक्षक मतदारसंघात कोल्हापुरचेच प्रतिस्पर्धी उमेदवार आमने सामने असल्याने सतेज पाटील यांनी पुण्यातूनच प्रचाराची रणनीती आखल्याचे मानले जाते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×