Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Pune Tourism Development : तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

Pune Tourism Development : तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

marathinews24.com

पुणे – Pune Tourism Development : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध कामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतला. संबंधित विकासकामांची सद्यःस्थिती, प्रगती, आवश्यक प्रशासकीय कार्यवाही आणि निर्धारित कालमर्यादा याबाबत संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात आली.

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाला सुरुवात – सविस्तर बातमी 

राजमाता सईबाई स्मृतीस्थळासाठी आवश्यक भूसंपादन आणि खरेदीखत प्रक्रियेबाबत कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच राजमाता सईबाई स्मृतीस्थळ आणि संत जगनाडे महाराज स्मारकाच्या कामांची सद्यःस्थिती तपासून निर्धारित कालमर्यादेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सिंहगड आणि राजगड किल्ल्यांवरील पर्यटनविषयक सुविधांचाही आढावा घेण्यात आला. पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, सुरू असलेली विकासकामे तसेच संबंधित प्रशासकीय बाबींची माहिती घेण्यात आली. Pune Tourism Development ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा विचार करून विकासकामे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विविध विकासकामांची गुणवत्ता आणि निर्धारित कालमर्यादा याबाबत संबंधित यंत्रणांनी नियमितपणे आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. कामांमध्ये होणारी दिरंगाई टाळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी विविध आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांचा टप्पानिहाय आढावा घेऊन आवश्यक त्या प्रशासकीय बाबी पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पुरातत्त्व विभाग आणि पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×