Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

OBC Protest Pune : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाला सुरुवात

OBC Protest Pune : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाला सुरुवात

सकल ओबीसी समाज, पुणे चा सहभाग

marathinews24.com

पुणे – OBC Protest Pune : ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणात मंगेश ससाणे, मृणाल ढोले, सुनीता भगत, दिपक जगताप, शोभा शेवकरी, नितीन बोराटे, धनंजय झुरंगे, हनुमंत टिळेकर, सतिश गिरमे स्वप्नील वाघमारे यांसह सकल ओबीसी समाज, पुणे सहभागी झाले आहेत.

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम – सविस्तर बातमी 

ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये जातनिहाय जनगणना, बोगस कुणबी दाखल्यांवर कारवाई, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व वसतिगृह सुविधा, शिक्षण व रोजगारातील आरक्षणाचा अनुशेष भरून काढणे, OBC Protest Pune स्वतंत्र व पुरेसा ओबीसी निधी, राजकीय आरक्षणा संदर्भातील प्रश्न तसेच मंडल आयोगाची पूर्ण अंमलबजावणी यांचा समावेश आहे वेळोवेळी प्रशासनाला व सरकारला सांगूनही देखील दखल घेतली नाही, त्यामुळे ११ सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्यात आले होते. पण प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आता साखळी उपोषण सुरु करण्यात आले.

साखळी उपोषणाची सुरुवात रणरागिणी गौरीताई अक्षय पिंगळे, सुरेश सोपानराव कालेकर (शिंपी समाज) आणि बंडू उर्फ दीपक विठ्ठलराव कचरे यांच्या सहभागाने झाली. आंदोलनात विविध ओबीसी संघटना व कार्यकर्ते सहभागी झाल्या असून, शासनाने ओबीसी समाजाच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×