Breking News
Pune Crime News : पुण्यातील रास्ता पेठ, लोणी काळभाेर भागात घरफोडीPune Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा गुंड तडीपारPune Traffice Police : दिवाळीत व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदीPune RTO Action : दिवाळीत खासगी बसने भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई होणारFake Currency Racket Pune : बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा कारखाना उध्वस्त, चौघांना बेड्याRana Suryavanshi Attack Case : हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरूPune Crime News : गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडलेPune Bike Theft Case : पुण्यात दुचाकी चोरी करणार्‍याला अटक; ५ गाड्या जप्तPune Election News : पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जPune Online Scam : तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवले, महिलेला २६ लाखांचा गंडा

Seva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम

केंद्रीय गुप्तचर विभागात उच्च पदावर नियुक्ती मिळविलेल्या माजी विद्यार्थ्याचा समाजकल्याण विभागाच्या वतीने गौरव

marathinews24.com

पुणे – दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत समाजकल्याण विभागाच्या वतीने ‘आशीर्वादाचा दिवा’ हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला.

महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख-जाधव यांचे नाव जवळपास निश्चित – सविस्तर बातमी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, युनिट क्र. १, विश्रांतवाडी येथे सन २०२३ ते २०२६ या कालावधीत एलएल.बी.चे शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी वैभव डोईजड यांची केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) या गुप्तचर विभागात उच्च पदावर नियुक्ती बद्दल व त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल समाजकल्याण विभागाच्या वतीने शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयात गृहप्रमुख श्रीमती विजयश्री बाबर यांच्या हस्ते वैभव डोईजड यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी वैभव डोईजड यांनी विद्यार्थ्यांसमोर आपली यशोगाथा आणि शैक्षणिक प्रवासातील अनुभव मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय निश्चित करणे, सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करण्याचा प्रेरणादायी संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

या यशोगाथेमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आणि जीवनात उच्च ध्येय गाठण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल असा विश्वास श्रीमती बाबर यांनी व्यक्त केला. Seva Sankalp Abhiyan

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×