Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

MLC Election 2026 : महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख-जाधव यांचे नाव जवळपास निश्चित

MLC Election 2026 : महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख-जाधव यांचे नाव जवळपास निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता; आज घोषणा

marathinews24.com

पुणे – MLC Election 2026 : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने हर्षदा देशमुख-जाधव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी पक्षांतर्गत चर्चेत त्यांच्या नावावर सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शिक्षणातील आर्थिक अडचणींवर शिष्यवृत्ती प्रभावी उपाय- डॉ. नितीन वाघमोडे – सविस्तर बातमी 

महाविकास आघाडीतील जागावाटप आणि उमेदवारीबाबतच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत वेग आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून हर्षदा जाधव यांना संधी देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे समजते. अधिकृत घोषणा झाल्यानंतर मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपला निवडणूक अर्ज दाखल करतील.

पदवीधर मतदारांच्या प्रश्नांवर निवडणुकीत विशेष भर राहणार आहे. रोजगाराच्या संधी, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्यविकास, उद्योग क्षेत्रातील संधी तसेच युवकांच्या विविध प्रश्नांवर प्रचारात भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. पुण्यासह परिसरातील मोठ्या संख्येने असलेल्या पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आगामी काळात विविध पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग येण्याची शक्यता आहे.

महिलांना राजकीय संधी देण्याच्या धोरणालाही या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झाले आहे. MLC Election 2026 शरद पवार यांनी यापूर्वी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, संधी मिळाल्यास महिलांनी विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे पक्षाकडून महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेचा भाग म्हणून हर्षदा जाधव यांच्या संभाव्य उमेदवारीकडे पाहिले जात आहे.

दोन जाधव एकमेकांशी भिडणार

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून स्मिता जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे, तर महाविकास आघाडीकडून हर्षदा जाधव देशमुख यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. दोन्ही उमेदवारांच्या उमेदवारीवर अधिकृत घोषणा झाल्यास ‘दोन जाधव भिडणार’ अशी राजकीय लढत पाहायला मिळणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×