शिक्षण, कौशल्य विकास आणि करिअरच्या संधींना बळ
marathinews24.com
पुणे – Girls Scholarship Pune : आर्थिक अडचणींमुळे मुलींच्या शिक्षणावर मर्यादा येऊ नयेत, यासाठी शिष्यवृत्ती महत्त्वाची भूमिका बजावते, असे मत आयकर आयुक्त (सूट), पुणे डॉ. नितीन वाघमोडे यांनी व्यक्त केले. लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे नूराह-अल-बासम हॉल येथे पदव्युत्तर व विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी १०० हून अधिक पदव्युत्तर विद्यार्थिनी आणि सुमारे ५० विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत सासवड नगर परिषदेचा विविधांगी उपक्रमांना वेग – सविस्तर बातमी
१९९५ पासून फाउंडेशनने आतापर्यंत सुमारे १९ हजार मुली व युवा महिलांना शिक्षण, कौशल्य विकास आणि करिअरच्या माध्यमातून सहकार्य केले आहे. २०२६ अखेरपर्यंत हा आकडा २० हजारांवर जाण्याची अपेक्षा आहे. डॉ. वाघमोडे यांनी विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीच्या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करावीत आणि भविष्यात समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
एलपीएफच्या संस्थापक व अध्यक्षा लीला पूनावाला म्हणाल्या की, आर्थिक परिस्थिती किंवा कौशल्याच्या अभावामुळे कोणत्याही पात्र मुलीच्या स्वप्नांना मर्यादा येऊ नयेत, हा फाउंडेशनचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. Girls Scholarship Pune मुलींना व्यावहारिक व अनुभवाधारित कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योग, कार्यक्षेत्राच्या अपेक्षांनुसार तयार करणे आवश्यक आहे. भक्कम निधी उभारणीमुळे हा उपक्रम अधिक व्यापक करता येईल आणि मुलींना शिक्षण, प्रगती व आत्मनिर्भर भविष्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देता येतील.























