Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Seva Sankalp Abhiyan : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत सासवड नगर परिषदेचा विविधांगी उपक्रमांना वेग

Seva Sankalp Abhiyan : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत सासवड नगर परिषदेचा विविधांगी उपक्रमांना वेग

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, जनजागृतीसह नागरिकाभिमुख सेवा देण्यावर भर

marathinews24.com

पुणे – Seva Sankalp Abhiyan : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ तसेच १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सासवड नगर परिषदेच्या वतीने शहरात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, जनजागृती आणि नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘सेवा संकल्प अभियान’ केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न ठेवता नागरिकाभिमुख सेवा तातडीने व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यावरही नगर परिषदेने भर देण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी दिली.

महिला आरोग्य, स्वच्छता, रक्तक्षय व पोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि लोकसेवा यांचा समन्वय साधत Seva Sankalp Abhiyan ‘स्वच्छ, सुंदर, हरित आणि सक्षम सासवड’ घडविण्याच्या दिशेने सासवड नगर परिषदेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मालमत्ता हस्तांतरण, नवीन नळ जोडणी, जन्म-मृत्यू नोंद प्रमाणपत्र, कर आकारणी, बांधकाम परवाना, झोन दाखला, बचत गट नोंदणी, ना-हरकत प्रमाणपत्र, ८-अ उतारा आदी विविध दाखले व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अभियानाच्या अनुषंगाने शहरातील ६ महत्त्वाच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छ व सुंदर सासवडच्या संकल्पनेला बळ देत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत ग्रामीण रुग्णालय, सासवड यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ शहराच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला या उपक्रमातून विशेष प्राधान्य देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची भावना आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न या अभियानांतर्गत करण्यात आला.

याशिवाय सासवड शहरातील बाजारपेठ परिसर आणि व्यापाऱ्यांमध्ये ‘प्लास्टिकमुक्ती अभियान’ राबविण्यात आले. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन नागरिक व व्यापाऱ्यांना करण्यात आले. कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंगबाबत जनजागृती आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याबरोबरच घरच्या घरी कंपोस्टिंग करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले, असेही चव्हाण यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×