Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Women Health Awareness Pune : महिला आरोग्य, स्वच्छता, रक्तक्षय व पोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

Women Health Awareness Pune : महिला आरोग्य, स्वच्छता, रक्तक्षय व पोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

रक्तक्षय प्रतिबंध व मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत मार्गदर्शन; पौष्टिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन

marathinews24.com

पुणे – Women Health Awareness Pune : सेवा संकल्प योजनेअंतर्गत सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे महिला आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, रक्तक्षय व पोषण या विषयांवर जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी सेवा संकल्प योजनेची माहिती देत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

‘व्यसनमुक्त समाज – निरोगी समाज’चा संदेश देत कुरकुंभ येथे व्यसनमुक्ती जनजागृती – सविस्तर बातमी 

डॉ. ओंकार शेलारे यांनी रक्तक्षय व पोषण या विषयावर सविस्तर माहिती देताना संतुलित आहाराचे महत्त्व, शरीरासाठी आवश्यक विविध पोषक घटक, रक्तक्षयाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच नियमित रक्त तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले.

तसेच वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीतील स्वच्छता आणि रक्तक्षय याबाबत सोप्या व प्रभावी पद्धतीने जनजागृती करण्यात आली. यासाठी विविध माहितीपूर्ण पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्या माध्यमातून उपस्थित महिलांना दैनंदिन आरोग्यविषयक बाबी अधिक सहजपणे समजून घेता आल्या.

Women Health Awareness Pune : दवाखाना कर्मचाऱ्यांनी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे प्रत्यक्ष नमुने आकर्षक व माहितीपूर्ण पद्धतीने मांडून शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनातून पौष्टिक व संतुलित आहाराची निवड, आवश्यक पोषक घटकांचे महत्त्व तसेच टाळावयाचे अथवा मर्यादित प्रमाणात सेवन करावयाचे पदार्थ याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच “सुदृढ महिला, निरोगी कुटुंब” या संकल्पनेला बळ देणारा व माहितीपूर्ण मार्गदर्शन, दृश्य माध्यमांचा प्रभावी वापर आणि पौष्टिक आहाराच्या प्रत्यक्ष प्रदर्शनामुळे कार्यक्रम विशेष उपयुक्त असल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी डॉ. जमादार यांनी १३ ऑक्टोबर रोजी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व १५ ऑक्टोबर रोजी आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×