Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Kurkumbh Addiction Awareness : ‘व्यसनमुक्त समाज – निरोगी समाज’चा संदेश देत कुरकुंभ येथे व्यसनमुक्ती जनजागृती

Kurkumbh Addiction Awareness : ‘व्यसनमुक्त समाज – निरोगी समाज’चा संदेश देत कुरकुंभ येथे व्यसनमुक्ती जनजागृती

सामूहिक शपथेसह पोस्टर्स व माहितीपर प्रदर्शनातून जनजागृती

marathinews24.com

पुणे – Kurkumbh Addiction Awareness : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे व्यसनमुक्ती जनजागृती व नशामुक्त जीवनशैली या विषयावर प्रभावी जनजागृती कार्यक्रमातून ‘व्यसनमुक्त समाज – निरोगी समाज’चा संदेश देण्यात आला.

एका छायाचित्राची ‘क्लिक’ विचार करायला लावणारी; हृदयनाथ मंगेशकरांकडून छायाचित्रकारांचे कौतुक – सविस्तर बातमी 

वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी उपस्थितांना आरोग्यदायी व व्यसनमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करावा, व्यसनाचा परिणाम केवळ व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावर होत नाही, तर त्याचा दूरगामी परिणाम कुटुंब, समाज आणि विशेषतः मुलांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

“आपण केवळ आपल्या आरोग्याची काळजी न घेता आपल्या कुटुंबाची आणि सभोवतालच्या समाजाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती समाजाचा अविभाज्य भाग असून आपल्या सवयी व कृतींचा परिणाम इतरांवरही होत असतो,” असे डॉ. जमादार यांनी नमूद करून डॉ. जमादार यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ दिली. व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्यासोबतच कुटुंबीय व समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Kurkumbh Addiction Awareness : यावेळी फार्मासिस्ट ऋषिकेश कोलसे यांनी व्यसनाचे विविध प्रकार, व्यसनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम तसेच व्यसनमुक्त आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. व्यसनापासून दूर राहणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून निरोगी समाजनिर्मितीसाठी आवश्यक असलेली सामाजिक बांधिलकी आहे, हा संदेश यावेळी देण्यात आला.

व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती आणि नशामुक्त जीवनशैली यासंदर्भातील विविध पोस्टर्स व माहितीपर चार्ट्स तयार करून प्रदर्शनातून उपस्थितांना व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती सोप्या व प्रभावी पद्धतीने देण्यात आली. कार्यक्रमास वैद्यकीय प्रशासन अधिकारी, विमाधारक तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×