Breking News
Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडले

शिवाजीनगर कोर्टाबाहेर दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार

marathinews24.com

पुणे – कोयताधारी टोळक्याने न्यायालयाबाहेर कायद्याचे धिंडवडे उडवले. बुधवारी भरदिवसा ५ जणांच्या टोळक्याने चॉपर आणि कोयत्याने खूनाच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीवर सपासप वार करुन दोन्ही मनगट तोडले. त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार करून गंभीर जखमी केले. हल्ल्यापासून वाचण्यासाठी संबंधिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुळशी पॅटर्न चित्रपटालाही लाजवेल अशापद्धतीने टोळक्याने त्याला पळवून १० ते १५ खुनी वार केले. शिवाजीनगर कोर्टाबाहेर दिवसाढवळ्या रक्तरंजित थरात बघताना अनेकांनी धास्ती घेतली.

एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

मंदार मारुती किवळे (वय ३५ रा. कात्रज, नवीन वसाहत) असे गंभीररित्या जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो १८ नोव्हेंबरला खुनाच्या गुन्ह्यातून जामीनावर जेलबाहेर आला होता. हल्ल्याची घटना बुधवारी (दि.२५) दुपारी एकच्या सुमारास शिवाजीनगर कोर्टाबाहेर घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाहून दोन पिस्तूल जप्त केले आहेत. आरोपींच्या शोधार्थ गुन्हे शाखेची पथके रवाना केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली. दरम्यान, भरदुपारी टोळक्याने संबंधितावर सपासप वार करीत पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, खुनातील आरोपी जेलबाहेर आल्यानंतर त्याच्यावर एवढ्या गंभीर स्वरुपात हल्ला होईल, याचे इंटेलिजन्स गोळा करण्यात पोलीस कमी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोयता, चॉपरने दोन्ही हाताचे पंजे तोडले

आरोपी मंदार किवळे हा कात्रजमधील संतोषनगरात झालेल्या खूनातील आरोपी असून, तो १८ नोव्हेंबरला जामीनावर बाहेर आला होता. त्यानंतर बुधवारी तो दुपारी पावणे एकच्या सुमारास न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर कोर्टात जात होता. त्याचवेळी मेट्रो स्टेशन परिसरात दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने मंदारला गाठले. त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करुन जखमी केले. त्यानंतर चॉपर, कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातून जाणार्‍या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. आरडा ओरड, कोयत्यांचा सपासप आवाजाने परिसरातील वकिलांसह नागरिकांनी धाव घेतली. त्यावेळी ५ जणांचे टोळके धारदार शस्त्राने मंदारवर वार करत होते. टोळक्याने मंदारच्या दोन्ही मनगटावर वर्मी घाव घातले. त्यामुळे दोन्ही हाताचे पंजे मगनटापासून वेगळे होउन कातडीला चिकटल्याचे दिसून आले. हल्ल्यानंतर दोन दुचाकीवर पाच जणांचे टोळके कोयते नाचवित परिसरातून पसार झाले.

कोयताधार्‍यांच्या दहशतीने वकील, नागरिकांमध्ये थरकाप

टोळक्याने कोयत्याने वर्मी घाव घालून मंदारला गंभीर जखमी केले. प्रत्येक घावातून रक्ताचे पाट, चिळकांड्या उडत होत्या. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांसह वकीलांचा थरकाप उडाल्याचे दिसून आले. गंभीररित्या जखमी झालेला मंदार मदतीसाठी याचना करत होता. मात्र, टोळक्याच्या धास्तीमुळे त्याला मदत करण्यासाठी कोणीही धावले नाही. हल्लेखोर पसार झाल्यानंतर मंदार स्वतः उठून १० ते १२ मीटर अंतर चालला. मात्र, त्यानंतर त्याला भोवळ आल्यानंतर तो जागेवरच कोसळला. दरम्यान, खुनी हल्ल्याची माहिती मिळताच न्यायालयात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले.

खुनाचा वचपा खुनी हल्ल्याने

घरालगत जमिनीच्या वादातून टोळक्याने २० एप्रिल २०२५ रोजी शुभम संतोष चव्हाण रा. संतोषनगर, कात्रज) याचा खून केला होता. त्यामध्ये सराईत अमर दिलीप साकोरे, मंदार मारुती किवळे, गिरीष सुभाष वावरे, योगेश बाबूराव डोरे यांचा समावेश होता. संबंधित गुन्ह्यात आरोपी मंदार किवळे याला १८ नोव्हेंबरला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर चार दिवसांपुर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता. तेव्हापासून टोळक्याने त्याच्यावर पाळत ठेवली. बुधवारी दुपारी मंदार न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर कोर्टात जात होता. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या टोळक्याने त्याच्यावर वार करुन हल्ला केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×