Breking News
Pune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाण

Satyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभा

 Satyashodhak Rally Pune

अभिरूप महात्मा फुले पारंपरिक बग्गीतून होणार सहभागी

marathinews24.com

पुणे – Satyashodhak Rally Pune : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्यावतीने शुक्रवारी (दि. २७ ) सत्यशोधक रॅली आणि अभिरूप सभेचे आयोजन केले आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला निघणारी ही रॅली ऐतिहासिक भिडे वाड्यापासून सुरू होऊन पुणे महानगरपालिकेत पोहोचणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या नवीन सभागृहात अभिरूप सभा होणार असल्याची माहिती उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिली.

शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठराव – सविस्तर बातमी 

सत्यशोधक रॅलीला दुपारी दोन वाजता भिडे वाडा येथे संविधान पूजनाने प्रारंभ होईल. त्यानंतर खुद्द महात्मा फुले यांच्या वेशातील कलाकार पारंपरिक बग्गीत विराजमान होतील. भिडे वाडा येथून अप्पा बळवंत चौक मार्गे ही रॅली पुणे महानगरपालिकेत दाखल होईल. तेथे फुले यांचे स्वागत करण्यात येणार आहे. पारंपरिक पुणेरी वेशभूषा परिधान केलेले शंभरहून अधिक नागरिक या रॅलीत सहभागी होणार आहेत.

महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना फुले यांच्या वेशातील कलाकार पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. Satyashodhak Rally Pune त्यानंतर सायंकाळी चार वाजता महापालिकेच्या नवीन सभागृहात अभिरूप सभेला सुरुवात होईल. यावेळी महापौर मंजुषाताई नागपुरे सभेला संबोधित करणाऱ्या महात्मा फुले यांचे स्वागत करतील. सभेला महापालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते, नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे महानगरपालिकेत आयुक्त आणि नगरसेवक म्हणून सात वर्षे काम केले होते. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याचा गौरव करण्यासोबतच सत्यशोधक विचारांचा जागर नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिरूप सभा सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत काही निमंत्रित नागरिकांनाही उपस्थित राहता येणार असल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×