Breking News
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड

शेततळ्याच्या आकारमानानुसार ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान; सर्व पात्र अर्जदारांची सोडतीद्वारे निवड

marathinews24.com

पुणे – MahaDBT Farmer Scheme: पुणे जिल्ह्यात संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करून शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकासाठी जिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व ४ हजार ७२६ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलवरील सोडतीद्वारे ही निवड झाली असून, शेततळ्याच्या आकारमानानुसार लाभार्थ्यांना कमाल ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढा – सविस्तर बातमी

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी आयुक्तालयाने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार अर्जदार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे. या प्रणालीद्वारे सातबारा, आठ-अ, आधार क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी अधिक सुलभ होणार आहे.

तालुकानिहाय निवड झालेल्या लाभार्थ्यांमध्ये आंबेगाव ३४७, बारामती ५१८, भोर १३१, दौंड ३८५, हवेली ७३, इंदापूर ८७४, जुन्नर ४६५, खेड ३३६, मावळ ९१, पुणे शहर ८०, मुळशी १, पुरंदर ८२९, शिरूर ५४५ आणि वेल्हे ५१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपली ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीतील नोंदणी तपासून घ्यावी. तसेच, योजनेअंतर्गत आवश्यक छाननी पूर्ण होऊन पूर्वसंमती मिळाल्यानंतरच शेततळ्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. पूर्वसंमतीपूर्वी काम सुरू करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×