Breking News
SOMI Maharashtra Chapter : नैसर्गिक प्रसूतीच्या जनजागृतीसाठी बारामतीत SOMI तर्फे देशव्यापी पदयात्रेचे आयोजनPune RMC Pollution Control : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारMaharashtra Germany Industrial Partnership : जर्मनीसोबतच्या औद्योगिक भागीदारीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक सक्षम – डॉ. अमोल शिंदेSunetra Pawar Pimpri Chinchwad : अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारNeelam Gorhe Book Launch : विधान परिषदेत पाच वेळा निवड होणे हा महिला सक्षमीकरणातील महत्त्वाचा टप्पा- राज्यपाल जिष्णु देव वर्माWagholi Accident Pune : पुण्यात वाघोलीत भीषण अपघात; मोटार दुभाजकाला धडकलीIllegal Tobacco Factory Pune : प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना उध्वस्त, ११ लाखांचा माल जप्तMarathi Book Publication Pune : स्थितप्रज्ञ राहून समाजप्रबोधनासाठी साहित्यनिर्मिती- प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमेHarshada Farande BJP Appointment : हर्षदा फरांदे यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्तीPune Crime News : बिबवेवाडीत गावठी दारू विक्री करणारा अटकेत

Baramati Sports News : बारामतीत राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा संपन्न

Baramati Sports News

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची मध्य प्रदेशातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

marathinews24.com

बारामती – Baramati Sports News  : शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,पुणे आणि पुणे सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा (१९ वर्ष मुले व मुली)जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे नुकत्याच उत्साहात पार पडल्या.

पुणे ग्रँड टूर २०२७ च्या तयारीला वेग द्या – सविस्तर बातमी  

स्पर्धेचे उद्घाटन बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते टॉस करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी नाना होळकर हे होते. या प्रसंगी श्री.सातव यांनी बारामती येथील अत्याधुनिक क्रीडा सुविधांचा खेळाडूंनी सराव व विविध स्तरांवरील स्पर्धांसाठी लाभ घ्यावा आणि खेळाडूंनी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ,नाशिक, नागपूर,लातूर, अमरावती,छत्रपती संभाजीनगर,कोल्हापूर या ८ विभागांमधून १०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले.या स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची देवास (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. Baramati Sports News

स्पर्धा विजेते अनुक्रमे – वैयक्तिक विजेते ( राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली खेळाडू )

१९ मुली- प्रथम- भक्ती संदीप क्षीरसागर (बुलढाणा), व्दितीय- पूर्वा सुनील सराटे (सांगली) ,तृतीय- सोनाल गणेश खर्चे (बुलढाणा) चतुर्थ- श्रावणी गजानन जोगदंड (बुलढाणा), पाचवा- दिव्या मनोज मोकळ (रायगड).
१९ मुले – प्रथम- सुयश संजय आडे (धाराशिव), व्दितीय- अनुराग पुरुषोत्तम पाटील (सातारा), तृतीय – अनुराग पुरुषोत्तम पाटील (पुणे), चतुर्थ- सनेश किशोर पाटील (जळगाव), पाचवा- हर्षवर्धन विठ्ठल पाटील (नांदेड) .

सांघीक स्पर्धा विजेते विभाग- प्रथम -लातूर ,व्दितीय – छ.संभाजीनगर,तृतीय – अमरावती
मुली – प्रथम – अमरावती ,व्दितीय- मुंबई ,तृतीय – छ.संभाजीनगर.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी प्रस्तावित केले. तर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, यांनी आभार मानले.
संतोष लवटे, तालुका क्रीडा अधिकारी, विल्सन ॲड्रीज सचिव सॉफट टेनिस असोसिएशन, प्रशांत रणदिवे,दादासो आव्हाड, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सुहास हाडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिमन्यु इंगोले, तसेच तांत्रिक पंच मंडळी व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×