नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची चार कोटी ४६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक यांच्यासह २० जणांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षक राजेंद्र सीताराम कांबळे (वय ५६, रा. पाषाण-सूस रस्ता) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जय भवानी सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय पडवळ (रा. नाना पेठ), रतन घनश्याम किराड (रा. टिंबर मार्केट, भवानी पेठ), संजय सोपान गायकवाड (रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यासह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेत बँकेची मुख्य शाखा आहे. संबंधित बँकेत २०२६ ते २०२८ या कालावधीत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळासह मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, व्यवस्थापक, रिक्षा खरेदी करुन देणारे मध्यस्थ (एजंट), तसेच कर्जदारांनी संगनमत करुन बँकेत गैरव्यवहार केला. नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर करण्यात आली. बँकेतील रक्कमेचा अपहार केला, तसेच नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर करुन चार कोटी ४६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनकर तपास करत आहे.






















