कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
marathinews24.com
पुणे – Supriya Sule Pune Crime Statement : ‘विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्याची ओळख गुन्हेगारी आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे. शिवाजीनगर न्यायालयासमोर झालेला एकावर कोयत्याने वार करुन गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेनंतर पुणेकरांच्या आणि एकंदरीत शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडले – सविस्तर बातमी
सुळे यांनी याबाबत समाज माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेनंतर समाज माध्यमातून सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘न्यायालय हे सर्वसामान्यासाठी ‘न्यायदानाचे मंदिर’ असते. (Supriya Sule Pune Crime Statement) जिथे प्रत्येक नागरिक न्यायाच्या आणि संरक्षणाच्या अपेक्षेने येतो, त्याच पवित्र वास्तूच्या परिसरात जर भरदिवसा रक्ताचा सडा पडत असेल, तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे पाहायचे? न्यायालयाच्या परिसरात पोलीस चौकी आहे, सुरक्षा बंदोबस्त आहे आणि पोलिसांची सततची वर्दळ असते. भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि हल्ला करण्याची हल्लेखोरांची हिंमत होते कशी?, गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते’, अशी टीका सुळे यांनी केली आहे.
‘ गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात कोयते उगारून दहशत माजविणे, भररस्त्यात गोळीबार करुन खून, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का नाही, असा प्रश्न पुणेकरांच्या मनात आहे.न्यायालयाच्या परिसरात झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सामान्य नागरिक दहशतीखाली आहेत. पुण्यातील पोलीस प्रशासन काय करत आहे ?, गुन्हेगारांवर जरब बसविण्यात पुणे पोलीस आणि गृहखाते अपयशी ठरले आहे. शहरातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, जेणेकरून सर्वसामान्य पुणेकरांना निर्भयपणे जगता येईल’, असे सुळे यांनी नमूद केले आहे.
न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा एकावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी न्यायालायच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवणे गरजेचे आहे. याबाबत पोलीस आयुक्तांकडे पुणे बार असोसिशनकडून पाठपुरावा केला जाणार आहे. न्यायालयाच्या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करणे गरजेचे आहे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
– सम्राट जांभुळकर, सचिव, पुणे बार असोसिएशन
न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा वाढविण्याची मागणी
‘शिवाजीनगर न्यायालाच्या आवारात बाँम्ब ठेवल्याची धमकी देण्याचे दोन प्रकार महिनाभरात घडले. त्यानंतर न्यायालयासमोर गोळीबार झाला. न्यायालयाच्या परिसरात वर्दळ असते. न्यायलयाच्या परिसरात कोयत्याने वार करुन गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. न्यायालायच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात यावी’, अशी मागणी वकिलांनी केली आहे.























