Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलन

Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026

विद्यार्थ्यांना साहित्यिक, लेखक व कलावंतांशी संवादाची संधी; ग्रंथदिंडी, कथाकथन, बालनाट्य, बालकवी संमेलन, वक्तृत्व स्पर्धा आणि साहित्यिक संवादांची मेजवानी

marathinews24.com

पुणे – Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, मराठी भाषा व साहित्याची आवड निर्माण करणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने २७ व २८ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे बालकुमार मराठी साहित्य संमेलन २०२६-२७ आयोजित करण्यात आले आहे. अमरेन्द्र भास्कर बाल कुमार मराठी साहित्य संस्था, पुणे यांच्या विशेष सहकार्याने होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनात नामवंत साहित्यिक, लेखक, चित्रकार, कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत.

संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान – सविस्तर बातमी  

ग्रंथदिंडी, परिसंवाद, साहित्यिक संवाद, बालनाट्य, पॉडकास्ट, कथाकथन, वक्तृत्व, बालकवी संमेलन आणि शिक्षक संमेलन अशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना साहित्यविश्वाची अनुभूती घेता येणार आहे. शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून, सकाळी १०.३० वाजता उद्घाटन समारंभ होईल. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पद्मश्री गिरीश प्रभुणे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 पहिल्या दिवशी पद्मश्री माधुरी पुरंदरे, मंजरी निंबकर, ज्येष्ठ बालसाहित्यिक सुरेश सावंत, आबा महाजन आणि चित्रकार प्रियाल मोटे यांच्याशी विद्यार्थ्यांना संवाद साधता येणार आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा विशेष साहित्यिक संवाद, ‘अलबत्या गलबत्या’ बालनाट्य तसेच चित्रपट कलाकार हेमंत ढोमे व सिद्धेश लोकरे यांचा टेड टॉक व पॉडकास्ट हे विशेष आकर्षण असणार आहे.

शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन भरारी’ उपक्रमातून नासा, इस्रो आणि दिल्ली येथील शैक्षणिक उपक्रमांचा अनुभव घेतलेल्या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी आपले अनुभव कथन करणार आहेत. ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमात बालभारतीचे लेखक विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. आयकर विभागाचे अधिकारी अभिनय कुंभार (आयआरएस) आणि ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत देशमुख यांचाही विद्यार्थी संवाद होणार आहे.

दुसऱ्या दिवशी बालकवी संमेलन, कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये मराठी, उर्दू तसेच दिव्यांग गटांतील विद्यार्थी सहभागी होतील. शिक्षकांसाठी कथाकथन, वक्तृत्व, कविता आणि पोवाडा सादरीकरणाचे विशेष शिक्षक संमेलनही आयोजित करण्यात आले आहे.

सायंकाळी ४ वाजता समारोप व पारितोषिक वितरण समारंभ होणार असून, यावेळी डॉ. नरसिंह महादेव जोशी, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि भारत सासणे उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्य, कला आणि संस्कृती महत्त्वाची – वीरधवल जगदाळे

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच वाचन, साहित्य, कला आणि संस्कृती यांचा समन्वय आवश्यक आहे. बालकुमार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामवंत साहित्यिकांशी संवाद साधण्याची आणि स्वतःच्या कलागुणांना व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांना सर्जनशील व संवेदनशील नागरिक बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.

वाचनसंस्कृती आणि अभिव्यक्ती कौशल्यांना चालना – गजानन पाटील
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या उद्दिष्टांनुसार विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्ये, सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि कल्पनाशक्ती विकसित होणे महत्त्वाचे आहे. बालकुमार साहित्य संमेलन हा या उद्दिष्टांना पूरक उपक्रम असून, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना साहित्यिक, लेखक आणि कलावंतांशी थेट संवाद साधण्याची संधी देऊन वाचनसंस्कृती व अभिव्यक्तीची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ – विवेक वळसे पाटील

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रतिभा आणि कल्पनाशक्ती आहे. या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. बालकुमार साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांना साहित्य, कला, कथाकथन, कविता आणि वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या आत्मविश्वासात आणि अभिव्यक्ती कौशल्यात वाढ होईल, असे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026

वाचन, लेखन, चिंतन, कल्पनाशक्ती आणि प्रभावी अभिव्यक्तीची प्रेरणा देणाऱ्या या साहित्य संमेलनात जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×