वडिलांच्या स्मृती जागविण्यसाठी सिडनीहून गाठले गाव, शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे केले वाटप
Marathinews24.com
पुणे – दिवंगत वडिलांच्या स्मृती जागविण्यासाठी मुलीने थेट सिडनीहून मूळगाव गाठून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. त्यांनी विद्यार्थ्यांना यापुढेही मदत करीत राहणार असल्याचे सांगितले. त्यांच्या कृतीचे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी कौतुक केले आहे. स्वाती प्रांजल मोरे असे त्यांचे नाव असून, त्यांनी स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावातील श्रीराम माध्यमिक विद्यालयीतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण केले. यावेळी गावचे उपसरपंच प्रकाश होले, पांडुरंग पानसरे, रामभाउ शेंद्रे, डॉ. ज्योती विनोद कुटे, प्रमोद कुटे, लक्ष्मण कुटे उपस्थित होते.
महासंचालक विवेक श्रीवास्तव यांची पुणे अग्निशमन दलास भेट – सविस्तर बातमी
स्वामी चिंचोली गावातील प्रगतशील बागायतदार बबनराव कुटे यांचे लहान बंधू स्व. हनुमंत तुकाराम कुटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे वडिलांच्या स्मृती कायमस्वरुपी आठवणीत राहाव्यात. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक वस्तूंचा उपयोग व्हावा, यादृष्टीकोनातून मुलगी स्वाती मोरे यांनी काही दिवसांपुर्वी सिडनीहून मूळगाव स्वामी चिंचोली गाठले. त्यानंतर नातलगांसोबत श्रीराम विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कंपास वितरित केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सरतापे सर, शैलेश बारवकर, शिंदे, गाडे सर, गौरी सुर्यवंशी, विहान मोरे, मायरा कुटे, विराज कुटे, शिवराज सूर्यवंशी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ शेंद्रे, बारवकर सर, सरतापे सर, स्वाती मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिंदे सर यांनी आभार मानले.
वडिलांच्या स्मृती कायमस्वरुपी आठवणीत राहाव्यात यादृष्टीने श्रीराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. भविष्यात त्यांच्या इतर अडचणींवर मात करण्यासाठीही प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. स्वाती प्राजंल मोरे