Breking News
अखेर डॉ. सुशृत घैसास यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल…समाजसुधारणेचे दीपस्तंभ वै. सखाराम महाराज तडस यांची पुण्यतिथी विविध शहरांमध्ये भक्तिभावाने साजरी…सरकार तुम्हाला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी सक्षम; उपमुख्यमंत्री अजित पवारशेअर बाजारातील गुंतवणूक पडली २३ लाखांना…पुण्यातील पीएमपीएल बसप्रवास नको गं बाई, महिलांचे दागिने चोरणारी टोळी सुसाट…खाऊ घेऊन येत असताना चिमुरड्याला कारचालकाने चिरडले…खूनाच्या गुन्ह्यात तब्बल १४ वर्ष होता फरार, आरोपीला बेड्या…फिरता नारळी सप्ताह सांगता समारंभात मुख्यमंत्र्यांची हजेरी…वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, पुण्यातील बिबवेवाडीत घटनाहातबॉम्बची विक्री प्रकरण, आरोपीला कारावासची शिक्षा…

खेळण्यातील पिस्तूलाच्या धाकाने ज्वेलर्सवर दरोडा टाकणार्‍याना सराईतांना बेड्या

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी घेतला होता ससूनचा आसरा

Marathinews24.com

पुणे – नकली पिस्तुलाचा धाक दाखवून २० लाखांचे सोन्याचे दागिने लुटुन नेणार्‍या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या दोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने भोसरी येथून बेड्या ठोकल्या. महत्वाचे म्हणजे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपींनी ससून रूग्णालयाचा आसरा घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. राजेश उर्फ राजू चांगदेव गालफाडे (वय ४०) आणि श्याम शेषेराव शिंदे (वय ३७, रा. दोघेही रा. लांडेवाडी, झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. सराफाने नांदेडसिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना धायरी येथील रायकर मळा येथे श्री ज्वेलर्समध्ये घडली होती

वाल्मीक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर – सविस्तर वातमी

काळुबाई चौकात श्री ज्वेलर्स नावाचे सराफी पेढी आहे. दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगार दुकानात मंगळवारी (दि. १५) होते. त्यावेळी सराईत आरोपींनी दुकानात शिरून सोन्याचे दागिने चोरी करून दुचाकीवर पोबारा केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांची सात पथके आरोपीच्या तपासासाठी रवाना करण्यात आली होती. ८० सीसीटिव्ही फुटेज तपाल्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळील दुचाकी सिंहगड रस्त्यावरील गणपती मंदिराच्या परिसरात सोडली. तेथून ते एका रिक्षात बसण्यापूर्वी त्यांचे चेहरे सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाले. तसेच ज्या रिक्षात ते बसले त्या रिक्षाच्या मागही काढण्यात आला. ती रिक्षा ससून रूग्णालयाच्या परिसरात गेल्याचे पोलिसांना आढळले.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी जवळजवळ तासभर ससून रूग्णालयाच्या परिसरात घालवला. त्यानंतर चोरट्या मार्गाने त्यांनी भोसरी गाठली. दरम्यान आरोपी हा भोसरी परिसरात असल्याची माहिती मिळताच दोघांना अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे, सहाय पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान पवार, सहायक पोलिस निरीक्षक सी. बी. बेरड, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, अमंलदार गणेश लोखंडे, सुरेश जाधव, शशिकांत नाळे, अमोल सरतापे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top