Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर…

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले

Marathinews24.com

पुणे – बीडमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर देण्यात आली होती, असा मोठा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. पुण्यात विमानतळ येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना “एन्काऊंटरचा आदेश तुम्हाला दिला होता का? यावर त्यांनी कोणी असा एन्काऊंटरचा आदेश देईल का? या सगळ्या चर्चा बंद दाराआडच्या चर्चा आहेत. मी जे पुरावे मी सादर करतोय, मला त्याबाबत विचारावे. ज्यादिवशी मतदान होतं. त्यादिवशी माझ्या बँक खात्यात १० लाख रुपये आले,” असा गौप्यस्फोट कासले यांनी केला.

पोलिसांकडून बसमधील दोन्ही तीव्रता पडताळणी – सविस्तर बातमी

कासले म्हणाले, संत बाळूमामा कंस्ट्रक्शन कंपनी ही वाल्मिक कराडच्या मालकीची आहे. या कंपनीत महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या बँक खात्यावर १० लाख रुपये आले आहेत, अशीही माहिती कासले यांनी दिली. त्यापैकी साडे सात लाख रुपये मी परत केले आहेत. उर्वरित पैशातून माझा खर्च चालू आहे, असे कासले यांनी सांगितले.

मला १० लाख रुपये देण्यात आले “तेव्हा माझ्या बँक खात्यात ४१६ रुपये होते. ईव्हीएम मशीनपासून दूर जायचं. ईव्हीएम मशीला छेडछाड होईल ते सहन करायचं. तसेच मी गप्प बसावे म्हणून मला हे दहा लाख रुपये देण्यात आले होते. परळीला माझी ड्यूटी होती. तिथे अपुरं मनुष्यबळ होतं,” अशी अनेक प्रश्न उपस्थित करणारी माहितीही कासले यांनी दिली. धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

पुण्यात मी शरण जाण्यासाठीच आलो आहे. मी अजून १५ दिवस जरी गेलो असतो तरी मला कोणी पकडले नसते. परंतु मी माझ्या मित्रांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. पुण्यातून बीडला जाऊन मी पोलीसांना शरण जाणार आहे. पुणे पोलिसांना मी विनंती केली आहे की मला संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या स्वाधीन करावे. दिल्लीत असताना मी पबमध्ये, लाल किल्ल्यात सगळीकडे जाऊन आलो. तसेच केंद्र स्तरावर ईव्हीएमवर चर्चा केली आहे.
रणजित कासले पुण्यात. मतदानाच्या दिवशी मला १० लाख रुपये ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दिले होते, असा दावा कासले यांनी केला आहे. तसेच एन्काऊंटरची सर्व चर्चा बंद दाराआड झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

माझ्या खात्यात ईव्हीएम आणि धनंजय मुंडे यांच्यापासून दूर राहण्यासाठी पैसे दिले होते. कराडच्या एन्काऊंटरची चर्चा बंद दारामागे करण्यात आली होती. दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधिकारी कराडचे हस्तक असल्याचा दावा त्यांनी केला आहे, असेही कासले म्हणाले.

निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी गेल्या काही दिवसापासून व्हिडिओच्या माध्यमातून अनेक खळबळजनक आरोप केले होते. वाल्मीक कराडला मारण्याची सुपारी देखील आपल्याला देण्यात आली होती, असा दावा देखील कासले यांनी केला होता. त्यासोबत कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही अनेक गंभीर आरोप व्हिडिओच्या माध्यमातून केले आहेत. रणजित कासले यांनी बीड पोलिसांना आपल्याला पकडून दाखवण्याचे ओपन चॅलेंज दिले होते. त्यानंतर स्वतःहून पोलिसांना शरण येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×