पुण्यातील काही लोकांचा समावेश
marathinews24.com
पुणे– जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठार झालेल्यामध्ये पुण्यातील काही जणांचा समावेश आहे. हल्ल्यात अनेजकण जखमी झाले आहेत.
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात मी निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हिंदुत्ववादी संघटनांची चळवळ मोडीत काढण्याचा डाव; भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी – सविस्तर बातमी
जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. असेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील संतोष जगदाळे जखमी, कुटुंबीय सुखरूप
संतोष जगदाळे,प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे हे तीन दिवसापूर्वी जम्मू काश्मीर येथे फिरण्यास गेले होते. आज दुपारी जो दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यामध्ये माझे दीर संतोष जगदाळे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे या दोघी सुरक्षित आहेत, अशी माहिती जगदाळे कुटुंबातील नातलगांनी दिली आहे.