Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

जम्मूतील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जण जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये पुण्यातील दोन जण जखमी

marathinews24.com

जम्मू – काश्मीरमधील पहलगाम झालेल्या हल्ल्यात पुण्यातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. संतोष जगदाळे (रा. कर्वेनगर वेदांतनगरी) आणि कौस्तुभ गनबोटे (रा. कात्रज) अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. गनबोटे हे पुण्यातील प्रसिद्ध फरसाण विक्रेते आहेत. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला द रेसिस्टंस फ्रंटने (टीआरएफ) यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दहशतवादी हल्ल्याचा निषेध; जखमींना वैद्यकीय मदत सुरू; मुरलीधर मोहोळ – सविस्तर बातमी 

पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. हल्ल्यात किमान २७ पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांचा।समावेश आहे. प्रामुख्याने कर्वेनगर आणि कात्रजमधील दोघा तरुणांना दहशतवाद्यांनी गोळया मारल्या, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. गनबोटे आणि जगदाळे कुटुंबाची अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, पुण्यासह राज्यातील अनेक पर्यटक उन्हाळ्यात जम्मू काश्मीरमधील वातावरण अनुभवण्यास जातात. सध्या हल्ल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.

जगदाळे कुटुंबीय मूळचे बारामतीचे

आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. ही कुटुंब मुळची बारामती तालुक्यातील असून सध्या कर्वेनगरमध्ये वेदान्तनगरीजवळ राहायला आहेत. हल्ल्यात संतोष आणि कौस्तुभ यांना गोळ्या लागल्या आहेत. त्यापैकी एकाच्या अंगात तीन गोळ्या घुसल्या आहेत. हल्ला दुपारी १२ वाजेच्या सुमारास ‘बैसारन’ नावाच्या हिरव्यागार कुरणाजवळ झाला. अचानक अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पर्यटकांवर बेधुंद गोळीबार सुरू केला. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात गोंधळ उडाला होता. जखमींना तात्काळ अनंतनाग व श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलांनी परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×