Breking News
हडपसरमधील उच्चभ्रु सोसायटीत भरदिवसा घरफोडीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अपुरी कामे तातडीने पूर्ण करावीतपतीच्या अनैतिक संबंधामुळे महिलेची आत्महत्यापुण्यात तरुणाकडून १० लाखांचा गांजा जप्तMonsoon Update : महाराष्ट्रात मान्सून का लांबणीवर जातोय…कधी होणार मान्सूनला सुरवात?असहिष्णू वातावरणात विनोद फुलू शकत नाही- प्रा मिलिंद जोशीपुण्यात सायबर चोरट्यांकडून ६ कोटी २५ लाखांची फसवणूकब्युटी पार्लरमधील महिलेकडून अंगठी चोरीलाफ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी

‘सुमिरनच्या पहिल्याच प्रयोगाने कोथरुडकर मंत्रमुग्ध

चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून साकारली भक्तिसंगीताची संध्याकाळ

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण ऑडिटोरियममध्ये गुरुवारी संध्याकाळी सुरांचे एक अद्भुत विश्व अवतरले होते. उपस्थित प्रत्येक रसिकाला मंत्रमुग्ध आणि भावविवश करणारी ही मैफल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे लोकप्रिय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती. देवगांवकर फाऊंडेशन संयोजनातून ‘सुमिरन’ या पहिल्याच भावगीत आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवले.

निवडणूकीच्या काळात देशाच्या नेतृत्वाला गांभीर्य नव्हते- शरद पवार – सविस्तर बातमी

आजच्या धावपळीच्या, डिजिटल आणि यांत्रिक जीवनशैलीत भावगीत आणि भक्तिगीतांची मैफल म्हणजे जणू वाळवंटात सापडलेला गोड झरा! कलाप्रेमी आणि सुजाण कोथरूडकरांच्या मनातील सुरांचा हा आनंद कायम फुलत राहावा, या संवेदनशील विचारातून आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून हा विनामूल्य सुरांचा नजराणा रसिकांसाठी खुला करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, राजकारणातील व्यस्त दिनचर्या बाजूला ठेवत स्वतः चंद्रकांतदादा पाटील संपूर्ण वेळ कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. सर्वसामान्य रसिकांमध्ये बसून एका खऱ्या कलारसिकाप्रमाणे ते भक्तिरसात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलली.

सुप्रसिद्ध गायक अमोल निसळ यांच्या भावपूर्ण गायकीने, बासरीवादक अमर ओक यांच्या बासरीतून उमटणाऱ्या दैवी सुरांनी आणि युवा गायक करण देवगांवकर यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. दादांनीही कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाटात मनापासून दाद दिली.

अमर ओक यांच्या बासरीच्या प्रत्येक सुरासोबत जणू रसिकांच्या मनातील जुन्या आठवणी, सुख-दुःख आणि ईश्वराविषयीची आत्मीय भावना जागृत होत होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक रसिक तृप्त मनाने आणि आनंदाची अविस्मरणीय शिदोरी सोबत घेऊन घरी परतला.

“पोटाची भूक भागल्यानंतर मनाची भूक निर्माण होते आणि अशा सांस्कृतिक उपक्रमांमधून ती भूक योग्य रीतीने भागवली जाते. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि विविध अडचणींमुळे अनेकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत नाही. अशा कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत,” असे प्रतिपादन चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×