फरासखाना पोलिसांनी रक्कम ताब्यात घेत प्राप्तिकर विभागाकडे तपास सोपविला
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सवात कसबा पेठेतील जिजामाता चौकात एकाकडे ४२ लाख रुपयांची रोकड सापडली. (Pune Cash Seizure) पिशवीत ठेवलेली ही रक्कम फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्याने हे प्रकरण तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जिजामाता चौकात शुक्रवारी (१८ सप्टेंबर) एकाकडे मोठी रोकड असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली.
पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले – सविस्तर बातमी
बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवी पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांनी या घटनेची नोंद (स्टेशन डायरी) केली. मोठ्या प्रमाणावर रोकड का बाळगली ?, तसेच या रक्कमेचा स्त्रोत काय आहे? ही रक्कम का बाळगली?, याबाबतची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली. (Pune Cash Seizure) ‘पोलिसांनी याबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. प्राप्तिकर विभागाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे’, अशी माहिती फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली.























